स्वदेशी पैसा पाठविण्यात एनआरआय आघाडीवर


देशाबाहेर राहून कमावलेला पैसा स्वदेशी पाठविण्यात यंदाही भारताने अव्वल स्थान कायम राखले असल्याचे जागतिक बँकेने जाहीर केले आहे. एनआरआयनी या वर्षात आत्तापर्यंत ६५ अब्ज डॉलर्स म्हणजे ४.२५ लाख कोटी रूपये भारतात पाठविले असून त्याखालोखाल चिनी लोकांनी ६१ अब्ज डॉलर्स मायदेशी पाठविले आहेत.

जागतिक बँक व नाणेनिधी यांच्या वार्षिक बैठकीत ही माहिती देण्यात आली. भारतात २०१७ मध्ये एनआरआय कडून मायदेशी पाठविण्यात आलेल्या रकमेत ४.२ टक्के वाढ झाली आहे. २०१६ मध्ये मात्र परदेशातून स्वदेशी येणार्‍या पैशांत ९ टक्के घट दिसली होती. त्यावेळी ६२.७ अब्ज डॉलर्स पाठविले गेले होते. भारत चीन पाठोपाठ परदेशातून मायदेशी पैसे पाठविणार्‍या देशांमध्ये चीन खालोखाल फिलिपिन्स ३३ अब्ज डॉलर्स, मेकिसको ३१ अब्ज, नायजेरिया २२ अब्ज डॉलर्स यांचा नंबर आहे

Leave a Comment