गुगलने त्यांचा नवा पिक्सल बुक लॅपटॉप बुधवारी लाँच केला असून हा त्यांचा आत्तापर्यंतचा सर्वात हलका व पातळ लॅपटॉप आहे. या लॅपटॉपचे वजन फक्त १ किलेा आहे. तो क्रोम ओएस व गुगल असिस्टंटसह उपलब्ध केला गेला आहे. त्याची बॅटरी १० तासांचा बॅकअप देईल असे कंपनीचे म्हणणे आहे. गुगल असिस्टंट बिल्टइन सह असलेला हा पहिलाच लॅपटॉप असून त्याच्यासोबत स्टायलर पेनही दिले गेले आहे. लिखाणाशिवाय अन्य अनेक कामांसाठी त्याचा उपयोग होणार असून हे सर्वात फास्ट स्टायलर असल्याचा कंपनीचा दावा आहे.
गुगलचा नवा पिक्सलबुक, वजन फक्त १ किलो
हस्तलिखित ओळखण्यात हे स्टायलर मशीन लर्निंगचा वापर करते. या लॅपटॉपला मोबाईल अॅप सपोर्ट मिळणार असून त्यावर ऑटाकॅड चालविता येणार आहे. मोठ्या स्क्रीनचा स्नॅपचॅटसाठी उपयोग होऊ शकणार आहे. कन्व्हर्टिबल, टचस्क्रीन च्या या लॅपटॉपचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे जेथे वायफाय नाही तेथे हॉटस्पॉट फोनने कनेक्ट करून त्याचा वापर करता येणार आहे. यूएस व कॅनडा येथे हे लॅपटॉप सर्वप्रथम दिले जाणार असून त्यासाठी प्री ऑर्डर घेतल्या जात आहेत. ३१ आक्टोबरपासून ते स्टोअर्समध्येही उपलब्ध होतील. या लॅपटॉपची किंमत ९९९ ढॉलर्स असून स्टायलरसाठी ९९ डॉलर्स मोजावे लागणार आहेत.