ऑस्ट्रेलियात सुरू झाले जगातील पहिले सँड होस्टेल


समुद्री वाळूपासून तयार केले गेलेले जगातील पहिले सँड होस्टेल ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट ब्रॉड बीचवर सुरू झाले असून आठवडयातील तीन दिवस म्हणजे बुधवार ते शुक्रवार तेथे राहता येण्याची सुविधा दिली गेली आहे. २० सप्टेंबरला ते सर्वांसाठी खुले केले गेले आहे. केवळ २१ दिवसात उभारल्या गेलेल्या या होस्टेलसाठी २४ टन वाळूचा वापर केला गेला आहे. जगप्रसिद्ध वाळू रचनाकार व सँडमन म्हणून ओळखले जाणारे डेनिस मसौद यांनी हे हॉस्टेल तयार केले आहे.

येथे एक आलिशान रूम, आठ बेडसची सोय असलेली एक डार्मेटरी, असून आऊट डोअर ओपन बार आहे. तारे निरखताना रात्र घालविण्याची संधी यामुळे मिळणार आहे तसेच येथे योगा, खेळ, लाईव्ह संगीत यांचाही आनंद घेता येणार आहे. वास्तविक पहिले सँड होस्टेल नेदरलँड येथे बनविले गेले होते मात्र ते स्पर्धेच्या निमित्ताने बनविले गेले होते. हे हॉस्टेल पर्यटक, प्रवासींसाठी बनविले गेले असल्याने ते जगातील पहिले सँड हॉस्टेल ठरले आहे.

Leave a Comment