भारतात मुकेश अंबानीच सर्वात श्रीमंत


फोर्ब्स मासिकाने 2017 मधील भारतातील शंभर श्रीमंत व्यक्तींची नावे जाहीर केली आहेत. या यादीत रिलायंस इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांची संपत्ती 38 बिलियन डॉलर आहे.

फोर्ब्सने प्रसिद्द केलेल्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत विप्रोचे अध्यक्ष अजीम प्रेमजी. त्यांची संपत्ती 19 बिलियन डॉलर आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिंदुजा ब्रदर्स (अशोक लेलैंड) यांची संपत्ती 18.4 बिलियन डॉलर आहे.

असे आहेत भारतातील टॅाप टेन श्रीमंत व्यक्ती 1). मुकेश अंबानी (रिलायंस इंडस्ट्रीज) संपत्ती- 38 बिलियन डॉलर, 2) अजीम प्रेमजी (विप्रो) 19 बिलियन डॉलर, 3) हिंदुजा ब्रदर्स (अशोक लेलैंड) 18.4 बिलियन डॉलर, 4) लक्ष्मी मित्तल (आर्सेलर मित्तल) 16.5 बिलियन डॉलर, 5) पल्लोनजी मिस्त्री (शापोरजी पल्लोनजी ग्रुप) 16 बिलियन डॉलर, 6) गोदरेज फैमिली (गोदरेज ग्रुप) 14.4 बिलियन डॉलर,7) शिव नादर (एचसीएल टेक्नोलॉजीज) 13.6 बिलियन डॉलर, 8) कुमार बिड़ला (आदित्य बिड़ला ग्रुप) 12.6 बिलियन डॉलर,9) दिलीप संघवी (सन फार्मास्यूटिकल इंडस्ट्रीज) 12.1 बिलियन डॉलर,10) गौतम अडाणी (अडाणी पोर्ट एंड सेज) 11 बिलियन डॉलर

Leave a Comment