जिओची अनलिमिटेड कॉलिंग सुविधा होणार लिमिटेड!


नवी दिल्ली : आत्तापर्यंत आपल्या असंख्य ग्राहकांना देशभरात अनलिमिटेड कॉलिंग देणारी ४ जी नेटवर्क कंपनी रिलायन्स जिओने फ्री कॉलिंगची सुविधा पुरवली. पण अनेकजण या सुविधेचा अनावश्यक वापर करत असल्याचे समोर आल्यामुळे कंपनीकडून ही अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा लिमिटेड करण्याचा विचार केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

जिओची सुविधा लाँचिंग करताना रिलायन्स ग्रुपचे मुकेश अंबानी यांनी जिओची वॉइस कॉलिंग सुविधा कायमस्वरुपी मोफत राहील, अशी घोषणा केली होती. तसेच जिओची ही सुविधा लाँच केल्यानंतर असंख्य युजर्स याचा वापर व्यवसायासाठी वापर करत असल्याचे कंपनीच्या निर्देशनास आले. तसेच सध्या अन्य काही मोबाईल कंपन्यांकडून कॉलिंगसाठी ३०० मिनिटे प्रतिदिवस दिले जात असल्यामुळे अनलिमिटेड कॉलिंगवर जिओकडून निर्बंध आणण्याचा विचार सुरु आहे. अनलिमिटेड कॉलिंगऐवजी युजर्सना ३०० मिनिटे प्रतिदिवस देण्याबाबत विचार सुरु आहे. पण जिओच्या सर्वच ग्राहकांसाठी हा नवा प्लॅन नसून, काही ग्राहकांसाठी असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

Leave a Comment