या फेस्टीव्हलमध्ये येतो बिअरचा महापूर


जर्मनीतील आक्टोबर फेस्टीव्हल हा जगभरात अतिशय लोकप्रिय उत्सव असून साधारण १५ दिवसांच्या या उत्सवात लाखो लिटर बिअर फस्त केली जाते. जगभरातील पर्यटक या उत्सवासाठीआवर्जून येत असतात. जर्मनीच्या म्युनिख शहरात या काळात यात्रेसारखी गर्दी असते आणि पुरूष महिला सर्वच जण मौजमस्ती, मनोरंजन, करमणूक करून घेताना बिअरचे पेलेच्या पेले रिचवत असतात. सप्टेंबरच्या अखेरी सुरू होणारा हा उत्सव आक्टोबरच्या मध्यापर्यंत चालतो. या वर्षीच्या उत्सवात किमान ७७ लाख लिटर बिअर फस्त केली जाईल असा अंदाज वर्तविला जात आहे.

जर्मनीत हा उत्सव १८१० सालापासून साजरा केला जातो. जर्मन बिअर जगभरात पसंत केली जाते. आक्टेाबर फेस्टीव्हल हा जगातील सर्वात मोठा मेळा असल्याचा दावा केला जातो. या मेळ्यात बिअरसाठी सर्वप्रथम स्टँडर्ड म्हणजे मानके ठरविली जातात. त्यानसुार निवडक कंपन्यांना येथे बिअर पुरविण्याची परवागनी दिली जाते. १९१० साली या उत्सवाची शंभरी साजरी झाली तेव्हा पंधरा दिवसाच्या काळात १ लाख २० हजार लिटर बिअरचा फडशा पर्यटकांनी पाडला होता.

१९१४ ते १९१८ या काळात पहिले महायुद्ध सुरू असल्याने या उत्सवाचे आयेाजन केले गेले नव्हते तसेच दुसरे महायुद्ध व महागाईमुळेही या उत्सवाचे आयेाजन केले गेले नव्हते. हे अपवाद वगळता दरवर्षी हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो.

Leave a Comment