चार कॅमेर्‍यांचा हुवाईचा नोव्हा टू आय स्मार्टफोन लाँच


चीनी मोबाईल उत्पादक कंपनी हुवाईने त्यांचा चार कॅमेरे असलेला स्मार्टफोन नोव्हा टू आय नावाने लाँच केला आहे. या फोनची किंमत अजून जाहीर करण्यात आलेली नाही. काळा, निळा व गोल्ड अशा तीन रंगात हा फोन आला असून गेल्या महिन्यात लाँच झालेल्या हुवाईच्या मायमॅग सिक्सचे हे इंटरनॅशनल व्हेरिएंट आहे.

या फोनसाठी ५.९ इंची फुल एचडी स्क्रीन,४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी दिली गेली असून या फोनचे कॅमेरे हे त्याचे खास वैशिष्ठ असल्याचे सांगितले जात आहे. या फोनला रियरमध्ये १६ व २ एमपीचे दोन कॅमेरे व्हर्टिकल सेटअपमध्ये दिले गेले आहेत. हे दोन्ही सेंसर पीडीएफ व ऑटो फोकस आहेत, सेल्फीसाठी फ्रंटला १३ व २ एमपीचे दोन कॅमेरे सेंसर, फिक्स फोकस लेन्स व फ्लॅशसह दिले गेले आहेत. रियर पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर असून त्याच्या सहाय्याने फोन अनलॉक करता येईल तसेच हा सेन्सर सेल्फी काढण्यासाठीही वापरता येणार आहे.

फोनसाठी अॅंड्राईड नगेट ७.० वर आधारित ईएमयू आय ५.१ ओएस असून हा फोन फोर जी एलटीई सह अनेक कनेक्टिव्हीटी ऑप्शनला सपोर्ट करतो.

Leave a Comment