अॅपलचा लेटेस्ट आयफोन टेन सुरवातीपासूनच महागडा म्हणून चर्चेत आहे मात्र अॅपल ज्याप्रमाणे हा फोन अधिक खपावा म्हणून तरफदारी करत आहे त्याचप्रमाणे अॅपलची कट्टर प्रतिस्पर्धी सॅमसंगही या फोनची विक्री वाढावी अशी अपेक्षा करत आहे हे सांगितले तर कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र हे पूर्ण सत्य असून या मागची अंदरकी बात वेगळीच आहे. अॅपलचा आयफोन टेन ९९९ डॉलर्सला विकला जात आहे त्यातील ११० डॉलर्स सॅमसंगच्या खात्यात येणार आहेत. सॅमसंग कंपनीच्या एनएएनडी फ्लॅश या कंपनीकडून अॅपलला चिप व ओएलईडी टेकनॉलॉजी दिली जाते त्याची ही किंमत आहे.
आयफोन टेनच्या विक्रीचा सॅमसंगला थेट फायदा
ओएलईडी स्क्रीन हा आयफोन टेनचे खास फिचर आहे.हे तंत्रज्ञान जगात सॅमसंग व एलजी या दोनच कंपन्यांकडे आहे. पैकी एलजी या क्षेत्रात नुकतीच उतरली आहे तर सॅमसंगने या क्षेत्रात त्यांचा चांगलाच जम बसविलेला आहे. अॅपलने २०१९ पर्यंत १३ कोटी आयफोन टेन विक्रीचे उदिष्ट ठेवले आहे याचाच अर्थ या विक्रीतून मिळणार्या रकमेचा १० टक्के हिस्सा सॅमसंगला आपोआपच मिळणार आहे. सॅमसंगने त्यांच्या लेटेस्ट गॅलेक्सी एस एटसाठी २०१९ पर्यंत ५ कोटी फोन विक्रीचे उदिष्ट ठरविले आहे. या विक्रीतून मिळणार्या रकमेच्या तुलनेत आयफोन टेन विक्रीतून सॅमसंगला ४ अब्ज डॉलर्स जादा मिळणार आहेत.