लग्नातील जेवणे, मंडपासाठी मोजावे लागणार जादा पैसे


लग्नाचा सिझन आता तोंडावर आला असताना यंदा लग्नाळू कुटुंबाना लग्नाच्या नियोजित खर्चात हात थोडा अधिक सैल सोडावा लागणार आहे. यंदा मांडव व लग्नातील केटरिंग या दोन्ही सेवांवर १ ऑगस्टपासूनच जीएसटी लागू केला गेला असल्याने लग्नखर्चात वाढ झाली आहे.

कांही मांडव कंत्राटदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार मांडवावर यापूर्वी कर नव्हता. स्टॉकमध्ये जेवढा माल आहे त्यावर वर्षात एकदा व्हॅट आकारला जात असे. हे कपांउंडींग शुल्क ६ टक्के होते. म्हणजे ५ लाखांचा माल असेल तर १५ हजार रूपये भरावे लागत व मांडव कंत्राटदार ते स्वतः भरत. आता मात्र मांडवाचे कंत्राट घेतले की ग्राहकाला पक्के बिल द्यावे लागणार आहे व या सेवेसाठी १८ टक्के जीएसटी लागू केल्याने त्याचा भार ग्राहकांवर पडणार आहे.

केटरिंगबाबतही आत्तापर्यंत मजुरीसह एकूण रकमेच्या ४० टक्के रकमेवर कर लावला जात नसे व उरलेल्या ६० टक्के रकमेवर १० टक्के कर होता. आता ही सेवाही जीएसटी खाली आल्याने त्यावर १८ ट्क्के कर भरावा लागणार आहे व त्याची वसुली ग्राहकांकडून केली जाणार आहे.

Leave a Comment