चलनावर असलेला गांधीजींचा फोटो नक्की कुठला?


राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा वाढदिवस २ आक्टोबर देशभर गांधीजयंती म्हणून साजरा केला जातो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, दलितांच्या उद्धारासाठी गांधीजींनी दिलेले योगदान मोठे आहे व त्यामुळेच त्यांना महात्मा व राष्ट्रपिता म्हणून देशाने मान दिला आहे. इतकेच नव्हे तर देशाच्या चलनी नोटांवरची त्यांची प्रतिमा छापली गेली आहे.

गांधीजींचा चलनी नोटेवर असलेला फोटो कुठला असावा याची माहिती आपल्याला बहुदा नसते. कांही जणांना ते पेंटींग किवा पोट्रेट असावे असेही वाटते. मात्र प्रत्यक्षात हा फोटो काढला गेलेला असून गांधीजी कोलकाता येथे व्हॉईसरॉय हाऊस मध्ये गेलेले असताना काढला गेला आहे. अर्थात ब्रिटीश काळात विविध लोकांचे फोटो चलनी नोटांवर होते.१८५७ नंतर आलेल्या रूपयांवर किंग जॉर्ज याची प्रतिमा होती. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दोन वर्षा किंग जॉर्जचे फोटो कायम हेते. मात्र त्यांनतर नोटेवर अशोकस्तंभ आला.

१९९६ साली भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटेच्या रूपात पूर्ण बदल केला व नंतर नोटेवर गांधीजींचा फोटो आला.आज नोटंाचे रंग, डिझाईन अनेकदा बदलले गेले आहेत मात्र गांधीजीचा फोटो बदलला गेलेला नाही. या सार्‍या नोटा महात्मा गांधी सिरीज म्हणून ओळखल्या जातात.

Leave a Comment