अमेरिकेच्या ३ संशोधकांना यावर्षाचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार


स्टॉकहोम – या वर्षाचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेचे ३ संशोधक जेफरी सी हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल यंग यांना संयुक्तरीत्या जाहीर करण्यात आला आहे. बायोलॉजिकल क्लॉकवर तिन्ही संशोधकांनी अभूतपूर्व काम केले आहे. ही क्लॉक नेमकी कशी काम करते आणि त्यांचे संशोधन नेमके काय होते याची संक्षिप्त माहिती जाहीर करण्यात आली आहे.

याबाबत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही संशोधकांना नोबेल अकॅडमीने वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल जाहीर केला. आपल्या कार्यातून या संशोधकांनी झाडे, प्राणी आणि मनुष्यांसाठी बायोलॉजिकल क्लॉक (जैविक घड्याळ) कशी काम करते आणि पृथ्वीच्या प्रदक्षिणेशी कशी मेळ घालते हे दाखवण्यात आले आहे. तिन्ही संशोधकांना ९० लाख स्वेडिश क्रोनर (जवळपास ७ कोटी २० लाख रुपये) एवढी पुरस्कार राशी देखील दिली जाणार आहे.

Leave a Comment