अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आपल्या येत्या मंगळ मोहिमेवर केवळ महिलांना पाठवणार आहे. पुरुष व स्त्रियांमध्ये संबंध वाढू नयेत, यासाठी हे बदल करण्यात येणार आहेत.
मंगळावर प्रणयाच्या भीतीमुळे नासा फक्त महिलांना पाठवणार
नासाच्या बहुप्रतीक्षित मार्स (मंगल ग्रह) मिशनमध्ये बदल करण्याची तयारी चालू आहे. ब्रिटिश अंतराळवीर हेलन शेरमन यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नासाने सादर केलेल्या एका अहवालात इशारा देण्यात आला आहे, की मंगळावरची ही मोहीम दीड वर्षांची असून या काळात महिला आणि पुरुष अंतराळवीर एकमेकांकडे आकर्षित होऊ शकतात. तसेच, त्यांच्यामध्ये संबंधही विकसित होऊ शकतात. हा अहवाल कधीही जाहीर करण्यात आला नाही, मात्र मंगळावर जाणाऱ्या अंतराळ यात्रेकरूंमध्ये एकतर सर्व महिला असाव्यात किंवा पुरुष असावेत, असे या अहवालात म्हटल्याचे हेलन म्हणाल्या.
क्रू मेंबर म्हणून सर्व महिला अंतराळवीर असणे सर्वात चांगले होय कारण एक टीम म्हणून महिला उत्तम काम करतात आणि नेतृत्व करण्याच्या स्पर्धेतून त्यांच्यात भांडणे व्हायची शक्यता कमी असते, असे या अहवालात म्हटले आहे.