करचोरांचा पत्ता लावण्यासाठी सरकारने दिले 650 कोटीचे कंत्राट


करचोरांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आता भारत सरकार सोशल मीडियावर लक्ष ठेवणार आहे. यासाठी सरकारने लार्सन एंड ट्रुबो (एल अँड टी) कंपनीला 650 कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक संजय जलोना यांनीरविवारी ही माहिती दिली.

‘हे वास्तविक प्रगत विश्लेषण असेल. यासाठी आम्हाला 100 मिलियन डॉलर म्हणजेच 650 रुपयांचा सौदा आहे. हे काही छोटे कंत्राट नाही,’ असे जलोना म्हणाले.

एल अँड टीला हे कंत्राट केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी) मिळाला आहे. या प्रकल्पात आर्थिक वेबपेज तयार केले जाणार असून संगणक ते स्वतः वाचू शकतील. ‘आम्ही कोणत्याही व्यक्तीचे व्यवस्थित वेबपेज तयार करणार आहोत. समजा त्या व्यक्तीची बायको पर्यटनासाठी सेशेल्सला गेली आहे आणि तिने आपली छायाचित्रे इन्स्टाग्रामवर अपलोड केली असतील, तर आम्ही त्याचा पत्ता लावू,‘ असे जलोना म्हणाले.

वास्तविक सरकारने देशातील कर संकलन वाढविण्यासाठी सर्वोत्तम डाटा विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment