भारताकडून अमेरिकन क्रूड ऑईलची प्रथमच खरेदी


आजवरच्या इतिहासात प्रथमच भारतीय तेल कंपनीने अमेरिकेकडून क्रू ड ऑईल म्हणजे कच्च्या तेलाची खरेदी केली असून हे तेल इंडियन ऑईल कंपनीकडून मागविले गेले आहे. हे तेल घेऊन येणारी मालवाहू नौका आज ओरिसातील परादीप बंदरात दाखल होत आहे. जुलैमध्ये इंडियन ऑईलने हे तेल खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिली होती.

इंडियन ऑईलपाठोपाठ हिंदुस्थान पेट्रोलियम,भारत पेट्रोलियम यांनीही अमेरिकन कंपनीकडून तेल खरेदीसाठी ऑर्डर दिल्या आहेत. या संदर्भात अधिक माहिती देताना इंडियन ऑईलचे अध्यक्ष संजीव सिंह म्हणाले, आम्ही पहिल्या टप्प्यात १६ लाख बॅरल तेल मागविले आहे. भारत सरकारने सरकारी रिफायनरी कंपन्यांना अमेरिका व कॅनडा येथून कच्चे तेल खरेदीची परवानगी दिली आहे. आजपर्यंत आपले कच्चे तेल मिडील इस्टमधून येत होते. मात्र अमेरिकेतील खरेदी खाडीदेशांपेक्षा स्वस्तात होत असल्याने येथून तेल आयात केले जात आहे.

Leave a Comment