महाभारत युद्धात झाला होता अणुबाँबचा वापर


फादर ऑफ अॅटोमिक बाँब म्हणून ओळखले जाणारे संशोधक रॉबर्ट ओफनहायमर यांनी केलेल्या संशोधनानुसार प्राचीन काळापासून अणुबाँबची ओळख होती आणि महाभारत काळात झालेल्या सर्वनाशी महायुद्धात या बाँबचा वापर केला गेला असावा.ओफनहायमर व त्यांच्या टीमने गीता व महाभारत यांचे सखोल अध्ययन करून हा निष्कर्ष काढला आहे. त्रिनिटी म्हणजे त्रिदेव मिशन या नावाने हे संशोधन केले गेले आहे.

ओफनहायमर यांच्या मते भारतीय युद्धशास्त्रात किंवा ऋषीमुनींकडून शस्त्रास्त्र शिक्षण देत असताना जी अनेक अस्त्रे आपल्या शिष्यांना दिली जात त्यात ब्रह्मास्त्राचा समावेश होता. अर्थात हे अस्त्र फारच निवडक शिष्यांना दिले जात असे कारण त्याची मारक क्षमता महाप्रचंड होती. ज्यांना जे अस्त्र दिले जात असे ते त्यांना डागल्यानंतर परत माघारी घेण्याचे कौशल्यही मिळवावे लागत असे. महाभारत युद्धात अश्वत्थामाला हे अस्त्र वापरण्याचे ज्ञान होते मात्र ते परत घेण्याचे ज्ञान नव्हते. महाभारत युद्धात लाखो सैनिक एकचवेळी एक क्षणात ठार झाल्याचे उल्लेख आहेत. दैवी अस्त्रामुळे ते मारले गेले असे उल्लेखही येतात. ते दैवी अस्त्र म्हणजे अणुबाँब असावा असा निष्कर्ष या टीमने काढला होता. १९३९ ते १९४५ पर्यंत हे संशोधन सुरू होते.

रामायणातही मेघनादला मारण्यासाठी लक्ष्मण ब्रह्मास्त्राचा वापर करत होता तेव्हा रामाने या अस्त्राने सारी लंका नष्ट होईल म्हणून हे वापरू नको असे लक्ष्मणाला सांगितले होते. कारण ब्रह्मास्त्र सोडले गेले की पृथ्वीवर त्यापुढची बारा वर्षे धान्य पिकू शकत नाही,नवीन झाडे उगवू शकत नाहीत इतकेच काय तर गर्भवती महिलांचे गर्भपात होतात असे सांगितले जात असे. विशेष म्हणजे जपानवर जेव्हा प्रथम अणुबाँब टाकला गेला त्यानंतर १२ वर्षे तेथेही हाच प्रकार घडत होता. शिवाय ब्रह्मास्त्रानंतर भयंकर उष्णता वाढते, तीव्र किरणे निर्माण होतात व दोन ब्रह्मास्त्रांची टक्कर झाल्यास पृथ्वीप्रलय होतो असे मानले जात होते. ही सारी लक्षणे अणुबाँबच्या वापरानंतरही अनुभवास आली आहेत. यामुळे ब्रह्मास्त्र म्हणजे अणुबाँब असावा असे निष्कर्ष काढले गेले आहेत.

Leave a Comment