गल्फ देशात सिगरेट, सॉफ्ट ड्रिंकवर पाप कर


संयुक्त अरब अमिरातीतील देशांनी तंबाखू व तंबाखू उत्पादने, एनर्जी ड्रिंक्स तसेच सॉफ्ट ड्रिंक्सवर सिन कर म्हणजे पापकर लागू केला आहे. रविवारपासून या कराची वसुली सुरू करण्यात आली आहे. यात तंबाखूजन्य पदार्थ व एनर्जी ड्रिंक्सवर १०० टक्के तर सॉफ्ट ड्रिंक्सवर ५० टक्के कर लागू केला गेला आहे.

यूएई व अन्य खाडी देशांना सध्या क्रूड आईल निर्यातीतून मिळणारा महसूल खूपच घटल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जागतिक स्तरावर संपन्न मानल्या जाणार्‍या या देशांना महसूलातील ही घट भरून काढण्यासाठी नवनवीन करांचा आधार घ्यावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर हा पापकर लागू करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर जानेवारीपासून कांही विशेष वस्तूंवर ५ टकके वॅट लागू करण्याच्या गल्फ को ऑपरेटिव्ह कौन्सिलच्या निर्णयालाही सहा सदस्य देशांना पाठिंब दिला आहे. या सहा देशात बहारीन, कुवेत,ओमान, कतार व सौदी यांचा समावेश आहे.

Leave a Comment