आयफोन ८मध्ये वापरता येणार हिंदी भाषा


बाजारामध्ये नव्याने उपलब्ध झालेल्या आय फोन 8 व 8 प्लस या दोन्ही फोनमध्ये हिंदी भाषा वापरता येणार आहे. ह्या फोनची किंमत ६४,००० रुपयांपासून सुरु होत आहे. भारतामध्ये खास वापरता येईल असा की बोर्ड या फोन मध्ये देण्यात आला असून, अकरा प्रादेशिक भाषांचा या फोनमध्ये समावेश केलेला असेल. आयफोन ८ मध्ये हिन्दी भाषेचा वापरही करता येणार आहे, असा संदेश रिलायंस जिओच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये प्रक्षेपित केला गेला. चीफ एक्झीक्युटीव्ह टिम कूक यांनी एका व्हिडियो द्वारे हा संदेश दिला आहे.

रिलायंस जिओने याप्रसंगी आयफोनच्या नवीन सिरीज सोबत दिल्या जाणाऱ्या अनेक सवलतींची घोषणा केली. जिओने ‘बाय बॅक‘ स्कीमची घोषणा केली असून, जे ग्राहक आयफोन ८ किंवा ८ प्लस खरेदी करतील, त्यांना पुढच्या वर्षी फोन बदलायचा असल्यास, फोन ची सत्तर टक्के किंमत परत केली जाईल असे जाहीर केले. ज्या ग्राहकांचे जिओ सिम प्लॅन महिन्याला ७९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचे असतील, त्यांना ह्या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. या सवलतीमुळे ग्राहकांना जुन्या फोनची चांगली किंमत मिळून त्यांना नवीन, अपग्रेडेड फोन घेता येणे सहज शक्य होईल असे जिओचे निर्देशक आकाश अंबानी म्हणाले. जिओ आणि अॅपल यांच्या संयुक्त प्रयत्नांनी ग्राहकांना उत्तम दर्जाची सेवा देणे शक्य होणार आहे, असे मुकेश अंबानी म्हणाले.

Leave a Comment