मुंबई : आज दसऱ्याचा सण देशभरात साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी बरेच लोक सोने खरेदी करतात. पण आपल्यापैकी कोणी या मुहूर्तावर सोने खरदी करण्यासाठी जात असाल तर ही बातमी तुम्ही जरूर वाचली पाहिजे. कारण ५० हजार रूपयांवरील सोने खरेदीससाठी आता आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर सरकारी ओळखपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
५० हजार रूपयांवरील सोने खरेदीसाठी आता ओळखपत्र अनिवार्य
२३ ऑगस्टपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी मुंबई ज्वेलर्स असोसिएशने सुरू केली आहे. पण गेल्या महिन्याभरात दसरा हा मोठय़ा प्रमाणावर सोने खरेदी होणारा पहिलाच मुहूर्त आहे. लग्नसराईचा मौसम सुरू होत असल्यामुळे दस-याच्या मुहूर्तावर सोन्याची जास्त उलाढाल होते. त्यामुळे सोने खरेदीला जाताना सर्व ग्राहकांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. एक तोळे सोन्याची किंमत साधारण २९ हजार ६०० रूपयांच्या घरात असल्यामुळे दोन तोळय़ांच्या आसपास सोने खरेदी करायचे असल्यास तुम्हाला वैध ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल.
दिशा पटनीचा हा हॉट BIKINI Video होत आहे वायरल