छोटे व्यावसायिक आणि ग्राहकांमधील दुवा :निसेवा ऍप


पुणे: छोट्या सेवा व्यावसायिकांसाठी रोजगार निर्मितीला चालना आणि नागरिकांना विनासायास आवश्यक सेवा -सुविधा एका क्लिकवर उपलब्ध करून देणारे ‘निसेवा ऍप’ विकसित करण्यात आले आहे. या ऍपवरील सुविधा ग्राहक आणि व्यावसायिक या दोघानांही विनामूल्य असून मध्यस्थाशिवाय थेट संपर्क आणि देशातील प्रमुख भाषांमध्ये उपलब्धता; आपल्या भागाच्या पिनकोडनुसार सर्च अशी या ऍपची वैशिष्ट्ये आहेत.

सध्याच्या काळात शहरीकरणाचा वेग वाढत असताना वायरमन, प्लंबर, मॅकेनिक, फिटर, पेस्ट कंट्रोल, टिफिन सेवा, शिकवणीवर्ग , यासह दैनंदिन आवश्यक असणाऱ्या विविध सेवा पुरविणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना मागणी वाढत आहे. मात्र या सुविधा घराजवळच उपलब्ध होतीलच असे नाही तसेच छोट्या व्यवसायिकांनाही लांब- लांब अंतर जावे लागते. घरात अथवा कार्यालयात अचानक वीज समस्या निर्माण झाली. चारचाकी गाडी आहे ;पण वाहनचालक नाही, मुलांना शिकवणी वर्गाला पाठवायचे मात्र घराजवळच, चांगले जेवण घरपोच हवे आहे. टीव्ही, फ्रिज दुरुस्ती, पेस्ट कंट्रोल यासह अनेक सेवा -सुविधा त्याही आपण राहत असलेल्या परिसरातच केवळ एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचे काम निसेवा करणार आहे.

हे ऍप मोबाईलवर गुगल प्लेस्टोरवर निसेवा [​ni:seva​] डाऊनलोड करून नोंदणी केवळ पाच मिनिटात आपल्या व्यवसायाच्या वर्गवारीनुसार तसेच नागरिकांना कोणत्या सुविधा हव्या त्याची नोंदणी करता येणार आहे.

Leave a Comment