भटकंतीला जाण्यापूर्वी….


मित्रांनो, तुमच्यापैकी बहुतेकांना आता दिवाळीच्या सुट्टीचे वेध लागले असतील. या सुट्टीत फिरायला जाण्याचे बेत आखले जात असतील. भटकंतीसाठी कोणी, कोणती तयारी करायची, याच्या चर्चा सुरू असतील. अर्थात, एकट्या-दुकट्यानं फिरायला जाणं आणि मित्र-मंडळींसोबत फिरायला जाणं यात बराच फरक आहे. मित्र-मैत्रिणींसोबत भटकंतीची मजा काही वेगळीच असते. त्यामुळे ग्रुपने फिरायला जाण्याकडे बराच कल दिसून येतो. असं असलं तरी अशा भटकंतीला जाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.

* ग्रुपमधील एकाला सगळं आपल्या पद्धतीने व्हावंसं वाटतं. त्याला बॉसिंगची सवय असते. अशी माणसं तुम्ही लगेच ओळखू शकता. या माणसांना आधीच ओळखा. यामुळे तुमची ट्रिप सुसह्य होईल.

* अशा भटकंतीत तुमच्यासोबत सुटे पैसे ठेवा. शेअरिंग करताना सुट्या पैशांची गरज लागते. हे पैसे हाताशी असणं चांगलं. यामुळे सुटे पैसे मागितल्यावर एकमेकांची तोंडं बघावी लागणार नाहीत.

* भटकंतीला जाताना डाएटचा विचार करू नका. मी हे खाणार नाही, मला हे नको असे नखरे थोडं बाजूला ठेवा. एखाद्या गोष्टीची ऍलर्जी असेल तर गोष्ट वेगळी पण डाएट अजिबात करू नका.

* स्वत:ला वेळ द्या. तुम्ही ग्रुपसोबत फिरायला आला आहात म्हणजे त्यांच्यासोबत सगळा वेळ घालवायला हवा असं नाही. थोडा वेळ स्वत:ला द्या. एखाद्या दिवशी मस्तपैकी एकटेच हुंदडायला जा. निसर्गरम्य ठिकाणी एकटेच फेरफटका मारा. मस्त रिलॅक्‍स व्हा.

* फिरायला गेला असाल तर सेल्फी स्टीक घरीच ठेवा. उगाच उठसूठ सेल्फी घेत बसू नका. त्यामुळेही भटकंतीचा खरा आनंद लुटता येणार नाही.

Leave a Comment