मुंबई : देशभरात १ ऑक्टोबरपासून अनेक बदल होणार असून तुमच्या खिशावरदेखील या बदलांचा परिणाम दिसून येणार आहे.
तुम्हाला बाजारात प्रत्येक गोष्टीवर दिसणार नवीन एमआरपी
व्यापारी ३० सप्टेंबरपर्यंतच जीएसटी लागू झाल्यानंतर जुन्या सामानांवर नवा एमआरपी स्टिकर लावून विकू शकत होते. पण आता १ ऑक्टोबरपासून बाजारात प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला नवीन एमआरपी दिसेल. ‘कन्झ्युमर्स मिनिस्ट्री’च्या नोटिफिकेशनची यासंबंधी वाट पाहावी लागेल.
कॉलदर स्वस्त झाल्याचा ग्राहकांना फायदा
इंटरकनेक्शन युझेस चार्ज ट्रायने अर्ध्याहून अधिक कमी केल्यामुळे हा दर १ ऑक्टोबरपासून १४ पैसे प्रति मिनिटपासून कमी होऊन ६ पैसे प्रति मिनिट होणार आहे. कॉलदर स्वस्त झाल्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे.
१ ऑक्टोबरपासून तयार राहा ‘या ‘बदलांसाठी
टोलवरील रांगेपासून होणार सुटका
१ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सर्वच टोल नाक्यांवर फास्टॅग असणाऱ्या गाड्या न थांबता जाऊ शकणार आहेत. डेडिकेटेड फास्टॅग लेन सर्व टोल नाक्यांवर तयार करण्यात आल्या आहेत.
‘एसबीआय’ने शिथिल केली मिनिमम बॅलन्सची अट
मेट्रो शहरांत मिनिम बॅलन्सची अट एसबीआयने ५००० रुपयांवरून कमी करत ३००० रुपयांवर आणल्यामुळे याचा फायदा जवळपास पाच करोड खातेधारकांना मिळणार आहे.
बँक खाते बंद करताना
कोणत्याही ग्राहकाला १ ऑक्टोबरपासून आपले स्टेट बँकेट असलेले आपले खाते बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. त्यासाठी त्याचे खाते फक्त एक वर्ष जुने असावे लागणार आहे. ग्राहकाने जर एखाद्या बँक खाते उघडल्याच्या १४ दिवसानंतर आणि एक वर्षापूर्वी आपले अकाऊंट बंद केल्यास त्याला ५०० रुपये आणि जीसएटी भरावा लागणार आहे.
चेकबुक बदलून घ्यावे लागणार!
भारतीय स्टेट बँकेमध्ये विलीनीकरण झालेल्या बँकेचे चेकबुक आहे त्यांना आपले चेकबुक बदलून घ्यावे लागणार आहे. या बँकांचे जुने चेकबुक आणि IFSC कोड ३० सप्टेंबरनंतर अवैध ठरणार आहे.