नोटाबंदीनंतरच्या बदलांमुळे बॅकांचे 3,800 कोटींचे नुकसान


नवी दिल्ली – नोटाबंदीनंतर पेमेंट सिस्टममध्ये आलेल्या बदलांमुळे बॅकांचे 3 हजार 800 कोटींचे नुकसान झाले आहे. देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या भारतीय स्टेट बॅंकच्या (एसबीआय) अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अहवालानुसार, नोटाबंदीनंतर कैशलेस पेमेंट सिस्टमसाठी खूप मोठ्या प्रमाणात पीओएस मशिन खरेदी करण्यात आल्या. या मशिनची संख्या जानेवारी 2016 पर्यंत 13.8 लाख तर यावर्षी जुलैअखेर 28 लाख इतकी आहे.

डेबिट आणि क्रेडिट कार्डनुसार व्यवहार वाढले असले तरी एमडीआर कार्डचा कमी वापर, कमकुवत टेलिकॅाम यंत्रणा यामुळे बॅकांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. पीओएस मशिनमुळे बॅकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे अहवालात म्हटले आहे.

एसबीआईचे अधिकारी सौम्य कांति घोष यांनी सांगितले की अनेक बॅकांनी मोठ्या प्रमाणात पीओएस मशीन खरेदी केल्या आहेत. पण पीओएसमधून होणारा व्यवहार हा एटीएमपेक्षा अधिक होईल तेव्हाच त्यांचा हेतु साध्य होईल. पण सध्या तशी परिस्थिती दिसत नाही.

Leave a Comment