महिलांवरील या बंदी कधी हटणार?


जगभरातील अनेक देशांत आजही महिलांसाठी अनेक बंधने आहेत. मुस्लीम देशांत ही बंधने जादा आहेत हे खरे असले तरी अगदी पाश्वात्य देशांतही महिलांवर कांही बंधने आहेतच. सौदी अरेबियाने या बाबत अनेक सकारात्मक पाऊले उचलली आहेत. नुकतेच स्टेडियममध्ये महिलांना कॉन्सर्टचा आनंद लुटण्याची संधी मिळाली त्या पाठोपाठ आता महिलांना वाहनचालक परवाने दिले जात आहेत. सौदी व अनेक अरब देशात महिलांच्या मालकीच्या कार्स आहेत पण त्या कार चालवू शकत नाहीत. आता निदान सौदीत तरी महिला कार चालवू शकणार आहेत.


जगभर महिला सबलीकरणाचे वारे वाहत आहेत. मात्र आजही अनेक देश याबाबतीत कित्येक दशके मागे आहेत.येमेनमध्ये महिलांसाठी कायदा वेगळा आहे. म्हणजे समजा एखाद्या महिलेने तिच्यावर अत्याचार झाल्यासंदर्भात साक्ष दिली तर ती अर्धीच मानली जाते. म्हणजे महिलेने दिलेल्या साक्षीला पुरूषानेही दुजोरा दिला तर ती साक्ष पूर्ण मानली जाते. घरातून बाहेर पडताना पुरूष बरोबर असल्याशिवाय ती एकटी जाऊ शकत नाही.


सौदी तसेच व्हॅटिकन सिटी, भूतान, लेबानन, ब्रुनेई व यूएई येथे आजही महिलांना मतदानाचा हक्क नाही. फक्त पुरूषच येथे मतदान करू शकतात.


इक्वाडोर मध्ये गर्भपाताचा कायदा कडक आहे. येथे गर्भपात करून घेणार्‍या महिलेला तुरूंगाची हवा खावी लागते. इक्वाडोर सरकारकडे किमान आजारी व मतिमंद महिलांसाठी हा नियम शिथिल केला जावा अशी मागणी केली गेली होती मात्र ती फेटाळली गेली. होंडुरास, चिले येथेही गर्भपात परवानगी शिवाय करता येत नाही.


सौदीने महिला दुष्कर्मांबाबत एक नवीनच नियम काढला आहे. घरातून महिला एकटी बाहेर पडली व तिच्यावर दुष्कर्माचा प्रसंग ओढवला तर त्यासठी तिलाच दोषी धरून तिच्याविरोधात केस दाखल केली जाते.

Leave a Comment