लिवाय ने गेल्या आठवड्यापासून असे एक जॅकेट बाजारात आणले आहे, जे विशेषतः सायकलस्वारांसाठी सायकल वाहन चालवितानाही टच कंट्रोलच्या तंत्रज्ञानामुळे त्यावरून स्वाईप व टॅप कमांड देऊन स्मार्टफोन वापरता येणार आहे. हे जॅकेट म्हणजे कंपनीच्या नव्या फॅशन कलेक्शनचा भाग असून ते नेहमीच्या डेनिम जॅकेटसारखेच दिसते. मात्र यातील हाताच्या कफजवळचा भाग जॅकॉर्ड फॅब्रिकने विणला गेला आहे व त्यात वायरलेस रूपात स्मार्टफोन सिंक होतो. याच भागाला केवळ टच केल्याने सायकलस्वार स्मार्टफोनचा वापर करू शकतो. या तंत्रज्ञानासाठी लेवायला गुगलने सहकार्य केले आहे.
लिवायने आणले टच कंट्रोल जॅकेट
कॅलिफोर्नियातील या कपडे उत्पादक कंपनीने हे जॅकेट मोबाईल इंटरनेट बूम ट्रॅकर जॅकेट वुईथ जॅकॉर्ड अशा नावाने आणले आहे. लिवायचे उपाध्यक्ष पॉल डिलिगर म्हणाले, हे केवळ पाहण्याचे तंत्र नाही तर ग्राहकांच्या खर्या गरजा ते पूर्ण करते. सायकलस्वार त्यांची अनेक कामे रस्त्यावरून नजर न हटविताही या मुळे करू शकणार आहेत. हे जॅकेट स्नप टॅग काढून धुता येते. शिवाय ते उबदारही आहे. या टच कंट्रोलने संगीत बंद करणे, दिशा जाणून घेणे, मेसेज वाचणे अशी कामेही करता येतात. याची किंमत ३५० डॉलर्स आहे. विशेष म्हणजे जॅकेटमध्ये वापरले गेलेले कंडक्टीव्ह धागे विविध प्रकारच्या फॅब्रिकमध्येही विणता येणार आहेत.