(फोटो सौजन्य-ट्विटर)
नवी दिल्ली – जगात सर्वात सुंदर असे पती-पत्नीचे नाते ओळखले जाते. त्यात असे देखील म्हटले जाते की या रेशीमगाठी स्वर्गात बांधल्या जातात. त्यानंतर त्यांची भेट पृथ्वीवर होते. सर्व नात्यापेक्षा नवरा-बायकोच्या या नात्याला वेगळे मानले जाते. या नात्यामध्ये कधी रुसवा-फुगवा, तर कधी प्रेमाचा वर्षाव होत असतो.
तुम्ही नाही ना दिली तुमच्या नवऱ्याला अशी यादी
पण सध्या सोशल मीडियावर असेच जोडपे जबरदस्त व्हायरल होत आहे. त्याचे कारण देखील तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडेल. त्याचे झाले असे की, ईरा नावाच्या या महिलेने तिच्या पतीला ताजी भाजी कशी खरेदी करावी याची एक यादी बनवून दिली. त्याचबरोबर या यादीत या महिलेने ताजी भाजी कशी असते याचे वर्णन आणि माहिती आकृतीच्या साहाय्याने दिली. या यादीत भाज्यांच्या नुसत्या आकृत्या नव्हत्या तर ताजी भाजी कशी असते व शिळी भाजी कशी असते, त्या आकृत्या काढून त्याखाली चुक व बरोबरच्या खुणा केलेल्या होत्या. या यादीला पाहून पती विचारात पडला की पत्नीच्या मर्जीसारखी ताजी भाजी नाही नेली तर आपले काय होणार?
Since many people wanted explanation of the vegetable list I gave to my husband @gaurav198512 , check for the answers 🙂 @zedchrmsm pic.twitter.com/s5pNJ7K2YP
— Era Londhe (@eralondhe) September 25, 2017
आपल्या ट्विटरवर ईराने ही यादी शेअर केली आहे. त्यात ती म्हणते की मी मागील आठवड्यात माझ्या पतीला भाजी खरेदी करण्याचे काम दिले होते. परंतु त्यांना ताजी भाजी कशी असते ते कळावे म्हणून मी एक यादी बनवून दिली आहे. ती यादी सर्व महिलांनी आपल्या पतींना दिली पाहिजे. जेणेकरुन ते चांगली आणि ताजी भाजी खरेदी करु शकतील. आता तुम्ही देखील तुमच्या नवऱ्याला अशा प्रकारची यादी देऊन भाजी खरेदी करायला पाठवणार की नाही.