फेक बातम्या रोखण्यात फेसबुक यशस्वी


सोशल मीडियात अग्रस्थानी असलेल्या फेसबुकने जर्मनमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात फेक न्यूजवर नियंत्रण आणण्यासाठी हजारो फेक प्रोफाईल काढून टाकली असल्याची माहिती फेसबूकच्या अधिकाऱयांनी दिली. अमेरिकेतील निवडणुकीच्या काळात बनावट प्रोफाईलच्या आधारे खोट्या बातम्या पसरविण्याचा उद्योग झाला होता. फेसबुकवर त्यावरून सातत्याने टीका होत होती. तसाच जर्मन निवडणुकीमध्ये प्रकार होऊ नये, असे प्रयत्न फेसबुकने केले होते.

युरोप, मध्य-पूर्व आफ्रिकेचे फेसबुकचे सार्वजनिक धोरण विभागाचे उपाध्यक्ष रिचर्ड अॅलन यांच्या दाव्यानुसार, खोटी माहिती पसरवण्यावर नियंत्रण आणण्यात जर्मन निवडणुकीत फेसबुकला चांगले यश मिळाले. फेसबुकवरील खोटी प्रोफाईल्स आणि खोटी माहिती पूर्णपणे थांबवता आली, असे नाही. पण आम्हाला त्या प्रकारच्या माहितीचा प्रसार रोखण्यात यश आले. सध्याच्या घडीला फेसबुक वापरकर्त्यांच्या न्यूज फीडमध्ये खोटी माहिती दिसण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे असे अॅलन यांनी निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment