पतंजलीच्या अंडरवेअर लवकरच भारतीय बाजारात


योगगुरू रामदेवबाबा व त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांनी आयुर्वेद हर्बल उत्पादनांच्या अभूतपूर्व यशानंतर आता अंडरवेअरपासून ते स्पोर्टसवेअरपर्यंत सर्व प्रकारचे कपडे बाजारात आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे.पतंजली टेक्स्टाईल उत्पादनांसाठी अलवर येथे पंतजली ग्रामोद्योगचे उद्धाटन करताना रामदेवबाबा यांनीच ही माहिती दिली आहे.

ते म्हणाले ग्राहकोपयोगी सर्व वस्तूंचे उत्पादन पतंजली करणार आहे यामागे विदेशी कंपन्यांचे वर्चस्व मोडून काढणे व स्वस्तात, चांगल्या दर्जाचा माल ग्राहकांना उपलब्ध करून देणे हा आहे. स्वदेशी कपड्यांसाठी ब्रँड नेम अजून ठरविले गेलेले नाही मात्र यात सुरवातीलाच ५ हजार कोटींच्या व्यवसायाचे लक्ष्य निश्चित केले गेले आहे. अतिशय चांगल्या दर्जाचे कपडे यातून उपलब्ध केले जातील व त्यात अंडरवेअर, जीन्स पासून ते स्वेटरपर्यंत सर्व प्रकारचे कपडे असतील.

पतंजली आयुर्वेदने अगोदरच हर्बल व नित्य गरजाच्या वस्तूंच्या बाजारपेठेत प्रवेश करून परदेशी कंपन्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. पतंजलीचे प्रमुख बाळकृष्ण यांचा देशातील श्रीमंतात आठवा नंबर असून नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात हा खुलासा झाला आहे. मात्र रामदेवबाबांनी बाळकृष्ण यांची संपत्ती विलासासाठी नाही तर त्याचा वापर गरीबांसाठी केला जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment