जगातला पहिला फिजेट स्पिनर फोन भारतात


फिजेट स्पिनर या खेळण्याने जगभरात मिळविलेली लोकप्रियता वादादित आहे. बॉल बेअरिंगवर फिरणारे हे त्रिकोणी खेळणे आबालवृद्धांचे आवडते बनले असून त्यामुळे ताणतणाव कमी होतात असाही दावा केला जात आहे. या खेळण्यापाठोपाठ आता फिजेट स्पिनर मोबाईलची चर्चाही जोरात सुरू असून जगातला पहिला या प्रकारचा फोन भारतीय बाजारात दाखल झाला आहे. हा फिचर फोन आहे.

हाँगकाँगची कंपनी चिली इंटरनॅशनल होल्डिंग प्रा.लिमि ने चिली के १८८ व एफओ फाईव्ह या नावाचे दोन फोन भारतीय बाजारात उतरविले आहेत. दिसण्यात एकदमच वेगळे असलेले हे फोन किंमतीने स्वस्त आहेत. खरे सांगायचे तर मल्टीमिडीया तंत्रज्ञानाने युक्त असे हे खेळणेच आहे. या फोनमध्ये गाणी ऐकणे,व्हीडीओ पाहणे, रेकॉर्डींग करण्याची सुविधा आहे. शिवाय हे फोन स्पिनरप्रमाणे फिरवून ताणतणाव कमी करण्याची सुविधाही आहे. अॅमेझॉनपासून ते शॉपक्लूजपर्यंत सर्व ऑनलाईन स्टोअर्समध्ये तसेच रिटेलरकडेही ते उपलब्ध आहेत.याची किंमत आहे १३०० रूपये.

सहा आकर्षक रंगात हे फोन उपलब्ध करून दिले गेले आहेत. त्याला एजीपीएस टेक्नॉलॉजी दिली गेल्याने लोकेशन ट्रॅकींग करण्याची सुविधा आहे तसेच ड्युअल सिम, ३.१ सेंमीचा स्क्रिन, ३२ एमबी रॅम, ३२ एमबी स्टोरेज ते मायक्रोकार्डच्या सहाय्याने ८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा,१.३ एमपीचा कॅमेरा अशी फिचर्सही आहेत. ब्ल्यू टूथ डायल म्हणजे स्क्रीनला टच न करता कॉल करण्याची सुविधाही यात आहे.

Leave a Comment