मायक्रोसॉफ्ट विंडोज नाही, अॅड्राईड वापरतात बिल गेटस


जगभराला मायक्रोसॉफ्ट विंडोजची देणगी देणारे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक व जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेटस यांनी एका मुलाखतीत ते स्वतः विंडोज नाही तर गुगलच्या अॅड्राईड ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर करतात असे सांगितले.फॉक्स न्यूजवर झालेल्या मुलाखतीत गेटस यांनी हा खुलासा केला. याचा अर्थ स्वतः गेटस यांनी विंडोजची साथ सोडून अॅड्राईडचा हात पकडला असा काढता येईल. स्टीव्ह जॉब्ज वरील एका प्रश्नावर बोलताना गेटस यांनी वरील विधान केले होते.

अॅपलच्या स्टीव्ह बरोबर त्यांचे संबंध नेहमीच चांगले होते मात्र त्यांच्यात वैचारिक मतभेद नेहमीच होते असे सांगताता गेटस म्हणाले जॉब्ज नंतरही अॅपलची प्रगती चांगली आहे याचा आनंद वाटतो. पुढे बोलताना ते म्हणाले मी संगणकावर काम करताना नेहमीच विंडोजचा वापर करतो मात्र माझा स्मार्टफोन अॅड्राईड ओएसवर चालतो. या फोनमध्ये मायक्रोसॉफटची खूप सॉफ्टेवअर आहेत. अर्थात त्यांनी ते कुठला फोन वापरतात याचा खुलासा केलेला नसला तरी ते एप्रिल २०१७ मध्ये लाँच झालेला सॅमसंग एस एट वापरत असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या फोनमध्ये मायक्रोसॉफटची ऑफिस, कोर्टाना व्हर्च्युअल असिस्टंट, आऊटलूक अशी अनेक सॉफ्टवेअर्स आहेत. गेटस आयफोन वापरत नाहीत हे मात्र नक्की आहे.

Leave a Comment