ट्विटरने वाढवली ट्विटची अक्षरमर्यादा


नवी दिल्ली – संदेशांसाठीची असलेली अक्षरमर्यादा वाढवण्याचा निर्णय ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटकडून घेण्यात आला असून त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर २८० अक्षरांची ट्विट लवकरच करता येणार आहेत. संदेशांसाठीची असलेली अक्षरमर्यादा काही महिन्यांपुर्वीच ट्विटरकडून १४० पर्यंत वाढवण्यात आली होती. पण ट्विटर आता २८० शब्दांचे संदेश लिहण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

अनेकांसाठी सध्या ट्विटरवरील १४० अक्षरांची मर्यादा अडचणीची ठरत असून तशी तक्रारही अनेक युजर्सनी केली होती. ट्विटरकडून या पार्श्वभूमीवर अक्षरमर्यादा दुपटीने म्हणजे २८० पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २४० अक्षरांचे पहिले ट्विट ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॅक डोर्सी यांच्याकडून करण्यात आले. हा बदल लहानसा आहे, पण आमच्यासाठी खूप मोठे पाऊल आहे. यापूर्वी ट्विटसाठी १४० शब्दांची तांत्रिक मर्यादा होती. लोकांना ट्विट करताना येणाऱ्या खऱ्या अडचणी लक्षात घेऊन आमच्या टीमने विचारपूर्वक जे बदल केले आहेत, त्याचा अभिमान वाटतो, असे डोर्सी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहले आहे.

Leave a Comment