मुंबई – जायंट सर्च इंजिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गुगल’चा आज १९ वा वाढदिवस आहे. गुगलने यासाठी एक खास डुडल तयार केले आहे. गुगलने युजर्ससाठी १९ व्या वाढदिवसानिमित्तानं खास १९ सरप्राईज आणली आहेत. तेव्हा गुगलच्या होम पेजवर तुम्ही क्लीक केल्यास गुगलकडून एक नाही तर तब्बल १९ आश्चर्याचे सुखद धक्के तुम्हाला मिळणार आहेत.
१९ व्या वाढदिवसानिमित्त गुगलच्या तुमच्यासाठी खास १९ सरप्राईज
आपल्या प्रत्येक वाढदिवसाला गुगलने डुडलद्वारे नेहमीच काहीतरी हटके तयार केले आहे. गुगलचे या १९ वर्षांत असेच लोकप्रिय ठरलेले काही डुडल्स ‘१९ सरप्राईज’मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. यासाठी होमपेजवर दिसणाऱ्या चक्रावर क्लिक केल्यास तुम्हाला एक एक करुन नवनव्या डुडल्सचा उलगडा होत जाईल.