सरकार २०२० पर्यंत ५जी सेवा चालू करणार?


देशात ५जी सेवा चालू करण्याच्या दिशेने पावले टाकत केंद्र सरकारने एक समिती नियुक्त केली आहे. देशात २०२० पर्यंत ५जी सेवा सुरू करण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे सांगण्यात येते.

“आम्ही उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती ५जी बाबत दृष्टिकोन, मिशन व लक्ष्य यांबद्दल काम करेल. जगात २०२० साली ५जी सेवा सुरू होईल, त्यावेळी भारतही जगाच्या बरोबर असेल असा मला विश्वास आहे,” असे दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा म्हणाले. दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे सचिव या समितीत असतील.

5जीशी संबंधित कामे करण्यासाठी सरकार ५– कोटी रुपयांचा निधी निर्माण करण्याचा विचार करत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुख्यतः संशोधन व विकास यांसंबंधात ही कार्ये होतील.

5जी तंत्रज्ञानाच्या अंतर्गत सरकार शहरी भागांमध्ये 10,000 मेगाबाइट प्रति सेकंद आणि ग्रामीण भागांमध्ये 1000 मेगाबाइट प्रति सेकंद या वेगाने इंटरनेट पुरविण्याची योजना बनवत आहे.

Leave a Comment