थ्रीडी स्कॅनरसह सोनी एक्सपिरीया एक्सझेड वन भारतात लाँच


जपानी स्मार्टफोन कंपनी सोनीने त्यांचा लेटेस्ट फ्लॅगशीप फोन सोनी एक्सपिरीया एक्सझेड वन नावाने भारतीय बाजारात सोमवारी लाँच केला आहे. अँड्राईड ओरियो ८.० ओएस सह आलेल्या या फोनचा कॅमेरा ही त्याची खासियत आहे. या फोनसाठी दिलेला १९ एमपीचा कॅमेरा थ्रीडी स्कॅन करण्यात सक्षम आहे. यात ग्रुप सेल्फीसाठी २२ एमएम रूंदीचे लेन्सही दिले गेले आहे.

या फोनसाठी मेटल युनिबॉडी डिझाईन दिले गेले आहे. फोनला ५.२ इंची फुल एचडी स्क्रिन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५.० प्रोटेक्शनसह दिला गेला आहे. स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर, ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने २५६ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, फिंगरप्रिंट सेन्सरसह पॉवर बटण, क्विक चार्ज टेक्नॉलॉजी ३.० अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. हा फोरजी व्होल्ट सपोर्ट करतो व पाणी व धूळ रेसिस्टंट आहे. मूनलिट ब्ल्यू, व्हिनस पिंक, वॉर्म सिल्व्हर, ब्लॅक अशा चार रंगात हा फोन लाँच झाला असला तरी भारतात तो फक्त ब्लॅक रंगात ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. फोनची किंमत आहे ४४९९० रूपये.

Leave a Comment