जगातील खडतर गंर्तांगळी मार्गावर चालण्याची संधी


साहस, रेामांचपूर्ण ट्रकिंकिगची आवड असणार्‍या पर्यटनासाठी उत्तराखंड राज्याने २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने जगातील खडतर मार्गांपैकी एक असलेल्या गंर्तागळी रस्त्यावरून चालण्याची संधी उपलब्ध करून दिली असून त्यात ३० ट्रेकर्सचा पहिला ताफा सहभागी झाला आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील समुद्रसपाटीपासून ११ हजार फूट उंचावर भारत चीन सीमेवर जाडगंगा खोर्‍यात हा रस्ता आहे.


एखाद्या शिडीप्रमाणे अरूंद व खतरनाक असलेला हा मार्ग १७ व्या शतकात पेशावर मधील आठ पठाणांनी खडक फोडून तयार केला होता. ३०० मीटर लांबीचा हा रस्ता त्यावेळी भारत तिबेट व्यापाराचा प्रमुख मार्ग होता. १९६२ पर्यंत चीनी व्यापारी याच मार्गाने लोकर, चामडी मीठ अशा वस्तूंचा व्यापार करत असत. मात्र भारत चीन युद्धांनंतर हा मार्ग भारतीय लष्कराच्या ताब्यात गेला. १९७५ नंतर लष्करानेही यामार्गाचा वापर बंद केला होता. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारने १९ लाख रूपये खर्चून या जर्जर झालेल्या मार्गाची दुरूस्ती हाती घेतली होती. उत्तरकाशीतल्या व्हेअ्रर ईगल्स डेअर ट्रेक संघटनेने दिल्ली, मुंबई, अलीगढ मधून आलेल्या ३० ट्रेकर्सना घेऊन हा मार्ग पुन्हा लांघण्यची योजना हाती घेतली आहे. या प्रकारे ४२ वर्षांनंतर हा खडतर मार्ग पुन्हा सुरू केला जात आहे.

Leave a Comment