योगगुरू बाबा रामदेव यांचे सहकारी व पतंजली आयुर्वेद कंपनीचे मुख्य, आचार्य बाळकृष्ण यांनी देशातील श्रीमंतांच्या यादीत गतवर्षाच्या २५ व्या नंबरवरून यंदा आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यांच्या संपत्तीत गेल्या वर्षात १७३ टक्के वाढ होऊन ती ७० हजार कोटींवर पोहोचल्याचे अशी आकडेवारी प्रसिद्ध करणार्या हुरन संस्थेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. पतंजलीने गतवर्षात १०,५६१ कोटी रूपयांचा व्यवसाय करताना अनेक नामवंत ब्रँडना जोरदार टक्कर दिली आहे.
रामदेवबाबांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांची श्रीमंती वाढली
बाळकृष्ण यांच्याबरोबरच डी मार्टचे राधाकृष्णन दमाणी यांच्या संपत्तीत ३२० टक्के वाढ झाली असल्याचे व ते देशातील १० अतिश्रीमंतांच्या यादीत समाविष्ट झाल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गेली सहा वर्षे पहिल्या नंबरवर असलेले मुकेश अंबानी यंदाही टॉपवर आहेत. या यादीत यंदा ८ नवीन उद्योजकांची भर पडली आहे. मुकेश जागातिक श्रीमंतांच्या यादीत १५ व्या स्थानावर आहेत. रिलायन्सच्या शेअरच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे त्यांच्या संपत्तीत भर पडली असून त्यांची एकूण मालमत्ता २५७० अब्ज रूपये आहे.