अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये बेरोजगारांना उत्तम संधी


नवी दिल्ली – अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या कंपन्यांकडून यंदा सणासुदीच्या काळात सुमारे १ लाख ३ हजार सीझनल नोकऱ्या निर्माण झाल्या असून या नोकऱ्या हंगामी स्वरुपाच्या असतील असे सुरूवातीलाच संबंधित कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यातील अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांकडे ४२ हजार नोकऱ्या आहेत.

याबाबत माहिती देताना ‘फ्लिपकार्ट’च्या प्रवक्त्यांनी सांगितले की, फ्लिपकार्टने २० हजारपेक्षा अधिक लोकांना सेलच्या आधी काम दिले आहे. या कंपन्यांकडून ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या वस्तू त्यांना वेळेत पोहचाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आहे.

रोजगारावर नोटबंदी आणि त्यानंतर जीएसटी लागू करण्याच्या निर्णयामुळे परिणाम झाला होता. पण या कंपन्यांकडून आता प्रशिक्षित तरुणांना मागणी असल्याने काही प्रमाणात दिलासादायक वातावरण बेरोजगारांसाठी निर्माण झाले आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टव्यतिरिक्त सॅमसंग, पेटीएम, मोबिक्विक आणि आदित्य बिर्ला मनी यांसारख्या कंपन्यांमध्येही कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून तेथेही नोकरभरतीची प्रक्रिया सुरु आहे.

Leave a Comment