हिमाचलमध्ये धावली पहिली स्वदेशी इलेक्ट्रीक बस


गोल्डस्टेान इन्फ्राटेक प्रा.लिमिटेडने बनविलेली पहिली पूर्ण स्वदेशी इलेक्ट्रीक बस ई बस के ७ हिमाचल प्रदेश राज्य परिवहन महामंडळाकडून देशात सर्वप्रथम वापरात आणली जात आहे. या बसचे लॉचिंग नुकतेच करण्यात आले व २२ सप्टेंबरपासून ती वाहतुक व्यवस्थेत दाखल झाली. या बसची प्रवासी क्षमता २६ असून ती झिरो एमिशन बस आहे.

कुलू मनाली रोहतांग मार्गावर ही बस सुरू करण्यात आली असून खडकाळ रस्ते, दुर्गम भागात तिच्या यशस्वी चाचण्या केल्या गेल्या आहेत.क्विव चार्जिंग तंत्रज्ञानाचा वापर यात करण्यात आला असून ही बस एका चार्जमध्ये २०० किमी अंतर कापू शकते. ही बस चार तासात पूर्ण चार्ज होते. तिच्यामध्ये लिथियम आयन फॉस्फेट बॅटरीचा वापर केला गेला आहे. जगातील बडी इलेक्ट्रीक वाहन कंपनी बाईड ऑटो इंडस्ट्रीच्या सहकार्याने ही बस तयार केली गेली आहे. त्याला एआरएआयने मंजुरी दिली आहे.

अशा २५ बसेस हिमाचल रस्ते परिवहन मंडळ त्यांच्या ताफ्यात घेणार असून मुंबईच्या बेस्टनेही अशा सहा बससाठी मागणी नोंदविली आहे.

Leave a Comment