दुबईला जाताय मग या पासून नक्की दूर रहा


आजकाल पर्यटकांसाठी दुबई हे हॉटस्पॉट डेस्टीनेशन बनले आहे. वाळवंटात फुललेले हे फुलपाखरासारखे शहर खूपच मनोहर व पर्यटनाचा पुरेपूर आनंद भोगण्यासाठी अगदी योग्य असले तरी येथे जात असाल तर तुम्ही परदेशी असलात तरी कांही गोष्टी कटाक्षाने करण्याचे टाळा अन्यथा पर्यटनाची मजा लुटण्याऐवजी नियम मोडल्याची सजा भोगायची वेळ तुमच्यावर येऊ शकते. तेव्हा आपला प्रवास सुखाचा, मजेचा, आनंदाचा व्हायला हवा असेल तर या गोष्टी चुकूनही करण्याचे मनात देखील आणू नका

रस्त्यातून जाता येताना, एखाद्या सार्वजनिक जागी असभ्य वाटतील अशा कोणत्याही खाणाखुणा, इशारे करू नका. तुमच्या मनात भले कांही वेडेवाकडे नसेलही पण दुबईच्या पोलिसांना असे इशारे, खुणा तुम्हाला तुरूंगात टाकण्याची संधी देतील. अगदी उदाहरण द्यायचे झाले तरी करंगळी वर करून दाखविली तरी तो दुबईत गुन्हा ठरू शकतो.


दुबईत अविवाहित पुरूष व महिला हॉटेलमध्ये एकाच खोलीत राहू शकत नाहीत. तसेच लग्नाअगोदर सेक्स करण्याचीही येथे परवागनी तर नाहीच पण तो सजा देण्यायोग्य गुन्हा समजला जातो. इतकेच काय सार्वजनिक जागेत तुम्ही जोडीदाराचे चुंबनही घेऊ शकत नाही.

पुरूष महिलांचे वाटतील असे कपडे घालू शकत नाहीत अथवा पुरूषांना महिलांसारखे दिसणेही येथे निषिद्ध मानले जाते. दुबईत अंगाला घट्ट बसतील असे कपडेही वापरण्यावर बंदी आहे.

सोशल मिडीयावर दुबई संदर्भात अपमानजनक भाषा अथवा पोस्ट चुकूनही टाकू नका तसेच येथे समलैगिकता हाही गुन्हा मानला जातो हे लक्षात ठेवा.


सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर मदिरापान करणे दुबईत बेकायदा मानले जाते. इतकेच काय पण रमजानच्या काळात तुम्ही सार्वजनिक जागी रोजा पाळणार्‍यांच्या समोर बसून कांही खाल्ले किंवा प्यायले, धुम्रपान केले तरी त्याबद्दलही तुम्हाला शिक्षा होऊ शकते.

दुबईत चुकूनही कुठल्याही महिलेचा फोटो तिची परवानगी घेतल्याशिवाय काढण्याच्या फंदात पडू नका.

Leave a Comment