रेल्वे तिकीटांच्या ऑनलाईन पेमेंटबाबत पसरली ‘ही’ अफवा


नवी दिल्ली – रेल्वे तिकीटांच्या बुकिंगकरता स्टेट बँक ऑफ इंडियासह ६ बँकांच्या कार्ड वापरावर आयआरसीटीसीने बंदी घातलेली नाही. प्रवाशांनी समाज माध्यमांतील अफवांवर विश्वास ठेवू नये असे आयआरसीटीसीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

बँक आणि रेल्वे प्रशासन यांच्यात सेवा शुल्काच्या आकारणीवरुन वाद सुरु असून आयआरसीटीसीने त्यावर तोडगा न निघाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआयसह अन्य ६ बँकांचे कार्ड रेल्वे तिकीटांच्या ऑनलाईन बुकिंगकरता वापरण्यावर बंदी घातली आहे. अशा आशयाच्या बातम्या आघाडीच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या. तसेच समाज माध्यमांतून संदेश फिरत होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रवाशांना आयआरसीटीसीने प्रसिद्धीपत्रक जारी करत ऑनलाईन पेमेंट करण्याचे ७ पर्याय सुरू असल्याचे म्हटले आहे.