टोराजान समाजात मृत्यू नाही…..


इंडोनेशिया – जगात विविध प्रकारची विविधता आहे, विविध समाजाचे विविध रीती रिवाज, परपंरा आहेत. लग्नापासून मृत्यूपर्य़ंत अनेकांच्या आपआपल्या काही प्रथा आहेत. इंडोनेशियातील असाच एक अनोखा समाज टोराजान. या समाजात मृत्यू झालेल्या व्यक्तीला मृत मानले जात नाही.

इंडोनेशियातील टोराजान या समाजातील नागरिक दर वर्षी आपल्या पूर्वजांच्या मृतदेहांना बाहेर काढून त्यांचा उत्सव साजरा करतात. येथील नागरिक आपल्या कुटुंबातील, नातेवाईंकामधील मृत व्यक्तींचे शव बाहेर काढतात. त्यांना अंघोळ घातली जाते. नवीन कपडे नेसवतात. त्यांच्या आवडीची गोष्ट त्यांच्यासाठी केली जाते. त्यानंतर त्यांची संपूर्ण शहरात वाजतगाजत मिरवणूक काढली जाते.

स्थानिक नागरिकांच्यामते, हा त्यांच्यासाठी जीवन उत्सव असतो. यामुळे मृत व्यक्तींशी आपले नाते अधिक चांगले होते. मृत व्यक्तीही त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. ते आपल्याला आर्शीवाद देतात.

Leave a Comment