नवी दिल्ली : आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर बीएसएनएलने आणली आहे. प्रत्येक टेलिकॉम कंपनी ग्राहकांना सणासुदीच्या काळात आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स लॉन्च करत आहेत. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोननंतर आता बीएसएनएलने एक जबरदस्त ऑफर आणली आहे.
बीएसएनएलची ‘विजय दशहरा’ ऑफर देणार ५०% कॅशबॅक
बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर खास ऑफर आणली असून या ऑफरचे नाव कंपनीने ‘विजय दशहरा’ असे ठेवले आहे. बीएसएनएलच्या नव्या ऑफरनुसार, तुम्हाला वॉईस कॉलिंग रिचार्जवर ५० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. पण यासाठी तुम्हाला बीएसएनएलच्या अॅप किंवा वेबसाईटवरुन रिचार्ज करावे लागणार आहे. ही ऑफर २५ सप्टेंबरपासून संपूर्ण देशभरात लागू केली जाणार आहे. तसेच ही ऑफर एक महिन्यापर्यंत सुरु राहणार आहे. २५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान विजय दशहरा ऑफरमध्ये कुठलेही रिचार्ज केल्यास तुम्हाला ५० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.