जिओ फोनचा पहिला लूक


दीर्घ काळ प्रतीक्षेनंतर जिओ फोन प्रथमच हाती आल्यानंतर त्याचे फोटो शेअर केले गेले आहेत. स्मार्टफोन व फिचरफोनमधील अंतर कमी करणार्‍या या फोनची पहिली झलक त्यामुळे जिओ ग्राहकांना दिसली आहे. रिलायन्स एलएफवाय ब्रँडचा हा फोन प्लॅस्टीक बॉडी व २००० एमएएच रिमुव्हेबल बॅटरीसह आहे. फोन जाडीला थोडा जास्त आहे.

या फोनला २.४ इंची डिस्प्ले असून २ एमपीचा बॅक व व्हीजीए फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. कीपॅडच्या डावी उजवीकडे कॉलिंग, डिस्कनेक्ट ऑप्शन्सची बटणे असून मधोमध व्हॉईस असिस्टंट बटण आहे. डिस्कनेक्ट बटणाच्या सहाय्यानेच फोन ऑनऑफ करता येतो. मॅट फिनिश बॉडी अतिशय स्मूथ आहे. फोनसाठी केएआय ओएस व्हर्जन २.० दिली गेली आहे.हा फोन अनेक जिअ्रो अॅप प्रीलोड करून मिळणार आहेच पण जिओ अॅप स्टोरमधून अॅन इन्स्टॉलही करता येणार आहेत. या फोनचे व्हिडीओ कॉलिंग फिचर खास आहे.

Leave a Comment