टीव्‍हीवर येण्‍याची वाट पहा


बॉक्स ऑफिसवर आज आणखी एक चित्रपट झाला आहे. तो म्हणजे बॉलीवूडचा मुन्नाभाई संजय दत याचा कमबॅक चित्रपट ‘भूमी’. ‘भूमी’चे दिग्‍दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे. तर जाणुन घेऊ यात कसा बनला आहे संजय दत्तचा भूमी हा चित्रपट.

चित्रपटाची कथा ही उत्‍तर प्रदेशात आग्रा येथे राहणा-या एका वडील आणि त्‍याच्‍या मुलीबद्दल असून अरुण सचदेव (संजय दत्‍त) त्‍याची मुलगी भूमीसोबत (आदिती राव हैदी) राहत असतो. चपलांचे अरुणचे दुकान असते. भूमी आणि निरज (सिद्धांत गुप्‍ता) यांचे एकमेकांवर प्रेम असते आणि लवकरच ते दोघेही लग्‍न करणार असतात. सर्वकाही सुरळीत सुरु असताना या बापलेकीवर धोली (शरद केळकर) नावाच्‍या व्हिलनमुळे मोठे संकट येते. भूमीवर धोलीची गँग रेप करते. भूमी आणि अरुणचे जीवन त्‍यामुळे पूर्णपणे बदलून जाते. ते न्‍यायासाठी पोलिस ते कोर्ट सगळीकडे चकरा मारतात. पण त्‍यांना याबाबत न्‍याय मिळतो का? शेवटी न्‍यायासाठी अरुण आणि भूमी काय करतात? या प्रश्‍नांची उत्‍तरे मिळवण्‍यासाठी तुम्‍हाला चित्रपटच पाहावा लागेल.

चित्रपटाचे दिग्‍दर्शन ओमंग कुमारने चांगले केले आहे. चित्रपटातील आर्टवर्कही चांगले आहे. पण कथेत काही नवीनपणा नाही. प्रेक्षकांसमोर तीच ती न्‍यायासाठी संघर्षाची कथा घासुनपुसन आणण्‍यात आली आहे. याशिवाय चित्रपटात एकही सरप्राईज एलिमेंट नाही. प्रत्‍येक चित्रपटात पुढे काय होईल याचा सहज अंदाज लागतो. चित्रपटाच्‍या डॉयलॉग्‍समध्‍येही काहीच दम नाही. संजय दत्‍तचा दीर्घ काळ पडद्यापासनू लांब राहिल्‍यावर कमबॅकसाठी ‘भूमी’ची निवड करण्‍याचा निर्णय चुकीचा ठरला आहे.

चित्रपटात संजय दत्‍तने शानदार परफॉर्मंस दिला आहे. त्‍याने पित्‍याची भूमिका अगदी जिवंत केली आहे. संजय दत्‍तच्‍या काही सीन्‍समुळे आपल्‍या डोळ्यातही पाणी येते. आदितीनेही चांगला अभिनय केला आहे. ती प्रेक्षकांना संजय दत्‍तच्‍या मुलीच्‍या रुपात आवडायला लागते. व्हिलनच्‍या भूमिकेत शरद केळकर याने देखील प्रभावी अभिनय केला आहे. एकंदर अभिनयाच्‍या बाबतीत या चित्रपटात कोणाकडूनही आपली निराशा होत नाही.

या चित्रपटाच्‍या गाण्‍यांना प्रेक्षकांनी पसंत केलेले नाही. त्‍यामुळे संगीताचा चित्रपटाला विशेष काही फायदा झाला, असे नाही. यावर अधिक काम करण्‍याची गरज होती. तुम्‍ही संजय दत्‍तचे डायहार्ड फॅन असाल तर हा चित्रपट तुमच्‍यासाठी आहे. नाहीतर टीव्‍हीवर हा चित्रपट येण्‍याची वाट पाहू शकता.