एका चार्जमध्ये १७७२ किमी धावली प्रोटेराची इलेक्ट्रीक बस


प्रदूषण समस्येवर जगभरातील विविध वाहन कंपन्या संशोधन करत असतानाच अमेरिकन इलेक्ट्रीक वाहन निर्माती कंपनी प्रोटेराने तयार केलेल्या इलेक्ट्रीक बसने एका चार्जमध्ये ११०१ मैल म्हणजे तब्बल १७७२ किमीचा प्रवास करून जागतिक रेकॉर्ड नोंदविले आहे. कॅटालिस्ट ई टू मॅक्स नावाच्या या बसची चाचणी अमेरिकेतील इंडियाना राज्यात घेतली गेली. ही बस ४० फूट लांबीची असून तिला ६६० केडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. या बसच्या यशस्वी चाचणीने हेवी ड्यूटी वाहनांसाठी वापरण्यात येऊ शकणार्‍या बॅटरीमध्ये खूपच प्रगती झाल्याचे सिद्ध झाले आहे.

या कंपनीच्या सध्या ४० फूट लांबीच्या व एका चार्जमध्ये ३५० मैल म्हणजे साधारण ६०० किमी जाणार्‍या बसेसची किंमत ७ लाख डॉलर्सच्या घरात आहे. कंपनीने अशा ४०० बस विकल्या आहेत व अमेरिकेतील १५ राज्यात त्या धावत आहेत. द.कॅरोलिनामधील ग्रीन व्हिले येथे कंपनीचा उत्पादन प्रकल्प आहे. कंपनी प्रमुखांच्या म्हणण्यानुसार सध्या या बस थोड्या महाग वाटत असल्या तरी त्यांच्या इंजिन देखभालीचा खर्च नेहमीच्या बस तुलनेत नगण्य आहे. शिवाय त्या इलेक्ट्रीकवर चालत असल्याने झिरो पोल्युशन करतात.

Leave a Comment