दीर्घ काळ होणार होणार अशी चर्चा असलेला गुगल व तैवानी स्मार्टफोन कंपनी एचटीसी मधील सौदा अखेर पूर्ण झाला असून गुगलने एचटीसीच्या मोबाईल डिव्हिजनची खरेदी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यासाठी एचटीसीला १.१ अब्ज डॉलर्स रोख मोजले गेले असल्याचे समजते. दोन्ही कंपन्यांनी या संदर्भात संयुक्त निवेदन जारी केले आहे.
गुगलकडून एचटीसी मोबाईल डिव्हिजनची खरेदी
या सौद्यानुसार गुगलच्या पिक्सल स्मार्टफोनसाठी काम करणार्या एचटीसीतील कर्मचार्यांना आता गुगलमध्ये समावून घेतले जाणार आहे. त्याचबरोबर एचटीसीकडचे या संदर्भातले बौद्धीक संपदा अधिकार वापरासाठी गुगलला वेगळे लायसन्स दिले गेले आहे. एचटीसी तर्फे सांगण्यात आले की स्मार्टफोन व्यवसायात गुगल बरोबर त्यांची भागीदारी दीर्घकाळ आहे. गुगलला मोबाईल डिव्हिजनचा कांही भाग विकला गेला असला तरी एचटीसी त्यांचा स्मार्टफोन व्ववसाय सुरूच ठेवणार आहे.