डिस्काउंटकाळात शॉपिंग


पावसाळा हा खास खरेदीचा ऋतू असल्याने बाजारातही डिस्काउंटच्या पाट्या झळकत आहेत. अशा वेळी स्मार्ट खरेदी करणे महत्त्वाचे आहे. आपल्या
बजेटमध्ये उत्तम खरेदी करायची असेल तर त्यासाठी काही टिप्स..

सध्या सगळीकडे शॉपिंगचा फिव्हर आहे. ऑनलाइन स्टोअर असो किंवा रोडवरील दुकान, त्या ठिकाणी सेलच्या पाट्या झळकत आहेत. आपल्याकडचा माल जास्तीतजास्त खपावा यासाठी प्रत्येक विक्रेता नवनवीन युक्ती लढविताना दिसून येत आहे. डिस्काउंटच्या टक्केवारीचे आकडे वाढतच असल्याचे दिसत आहे. पाच, दहा टक्‍क्‍यांपासून 50 टक्‍क्‍यांपर्यंत सवलती मिळत आहेत. “फ्लॅट 50 टक्‍के ऑफ’च्या पाट्या तुम्ही अनेक ठिकाणी वाचल्या असतील.

आगामी सणवारांसाठी खरेदी लवकर सुरू करण्याच्या विचारात असाल तर ही संधी सोडू नका. तसेही खरेदीसाठी निमित्ताची गरज नसतेच. कॉलेजसाठी शॉपिंग करायची संधीही साधता येईल. बाजारात मिळणाऱ्या डिस्काउंटचा तुलनात्मक आढावा घ्या. आता विचार कसला करताय? चला बजेटमध्ये बसणाऱ्या शॉपिंगला

*बजेट शॉपिंग करायचे म्हणजे कमी खरेदी करायची असे नाही. कमी कपड्यांमध्ये समाधान मानायचे असेही नाही. परंतु पर्यायी कपडे खरेदी करायचे. म्हणजे काय, तर तुमच्याकडे जीन्स असेल तर दुसरी जीन्स घेण्याऐवजी ट्राउझर, चिनोज किंवा पायजमा, धोती पॅंट असे काही तरी खरेदी करायचे.

* स्मार्ट शॉपिंगवर भर द्या. म्हणजे वेगवेगळी कॉम्बिनेशन्स करता येतील अशा बॉटम्स घ्या. जीन्सवर तुम्ही शर्टही घालू शकता. तसेच टी शर्ट किंवा कुर्ताही घालता येईल. त्यामुळे जीन्स कोणत्याही ऑकेजनला बेस्ट ठरेल.

* बजेट शॉपिंग करतानाही दर्जाबाबत तडजोड करू नका. नॉन सिंथेटिक कपडे घ्या.

* सध्याच्या सेलच्या काळात टॉप ब्रॅंडच्या फॅक्‍टरी आउटलेटमध्ये शॉपिंग करा. इथे तुम्हाला बेस्ट प्राइज मिळेल.

* ऑनलाइन पोर्टल्सवरही बेस्ट डील्स मिळू शकतील. या साइट्‌सवरही मॉन्सून धमाका सेल सुरू आहेत. त्यांचा लाभ घेता येईल. यानिमित्ताने वर्षभराचे शॉपिंग उरकून टाकता येईल. तेही स्वस्तात….

Leave a Comment