पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार ७८ दिवसांचा बोनस


नवी दिल्ली – आपल्या कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस भारतीय रेल्वेने जाहीर केला असून या प्रस्तावाला बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींसह अर्थमंत्री अरूण जेटली, रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यासह मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री या बैठकीला उपस्थित होते. रेल्वेच्या १२.३० लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

उत्पादकतेवर देण्यात येणाऱ्या बोनससाठी वेतनाची मर्यादा ही ७ हजार रूपयाइतकी निश्चित करण्यात आली आहे. पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या बोनसपोटी १७९५१ रूपये मिळणार आहेत. दसऱ्याच्या आत कर्मचाऱ्यांना बोनसची ही रक्कम दिली जाण्याची शक्यता असल्यामुळे २,२४,५४५ कोटी रूपयांचा बोजा रेल्वेवर पडणार आहे.

Leave a Comment