फोर्बजच्या लिजंडरी बिझिनेसमन यादीत भारताचे टाटा, मित्तल व खोसला


फोर्बजने नुकत्याच सादर केलेल्या जगातील १०० टॉप लिजंडरी बिझिनेसमन यादीत भारताच्या तीन उद्योगपतींचा समावेश आहे. भारताचे टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा, स्टील कंपनी मार्सेलरचे लक्ष्मी मित्तल व व्हीसी फर्म खोसला व्हेंचर्सचे विनोद खोसला यांच्याबरोबरच अमेझॉनचे जेफ बेसोज, फेसबुकचा मार्क झुकेरबर्ग, हॅथवेचे वॉरन बफेट, मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस, बांग्ला देशचे मायक्रोबॅकींग प्रणेते महमह युनूस, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप व जपानी उद्योगपती मसायाशी यांचा समावेश आहे.

मीठापासून ते सॉफ्टवेअर कंपन्यांपर्यंत सर्व उद्येागात असलेल्या टाटा समुहाचा २०११-१२ सालातला महसूल १०० अब्ज डॉलर्सवर नेण्यात रतन टाटा यांचे नेतृत्त्व तसेच त्यांचे निर्णय महत्त्वाचे ठरले होते. रतन टाटा यांनी कार्नेल व हावर्ड बिझिनेस स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले असून भारताचा दोन नंबरचा सर्वच्च नागरी पुरस्कार पदमविभूषणने त्यांना गौरविले गेले आहे. विनोद खोसला हे भारतीय वंशाचे अमेरिकन व्यावसायिक आहेत. सन मायक्रोसिस्टीमचे ते संस्थापक असून जावा लँग्वेजचे निर्माते आहेत.

लक्ष्मी मित्तल हे स्टील इंडस्ट्रीतील बडे उद्योगपती असून भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुकेश अंबानी यांच्यानंतर ते दोन नंबरचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी त्यांच्या कंपनीला अडचणीतून बाहेर काढताना नुकसानीतून कंपनीला १.८ अब्ज नफा मिळवून देण्याची कामगिरी केली आहे.

Leave a Comment