महिंद्राने पेश केला विनाचालक ट्रॅक्टर


महिंदा अॅन्ड महिंद्राने मंगळवारी त्यांचा पहिला विनाचालक ट्रॅक्टर चेन्नईतील महिंद्रा इनोव्हेशन अॅन्ड टेक्नॉलॉजी विंग या महिद्राच्या रिसर्च व्हॅलीत तयार करून लाँच केला आहे. या ट्रॅक्टरचा फायदा जगभरातील शेतकर्‍यांना होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. महिंद्रा हे ट्रॅक्टर क्षेत्रातील पायोनियर असून नव्या ट्रॅक्टरमुळे शेतीकामाला वेग येईलच पण उत्पादनांची गुणवत्ता वाढेल व उत्पादनांत प्रगतीही होईल असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

पुढच्या वर्षाच्या म्हणजे २०१८ च्या सुरवातीला हा ट्रॅक्टर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. अमेरिका व जपान या आंतरराष्ट्रीय बाजारातही हा ट्रॅक्टर लाँच केला जाणार आहे. २० ते १०० हॉर्सपॉवर इंजिन ताकद असलेल्या ट्रॅक्टरसाठी विनाचालक तंत्रज्ञान कंपनी ऑफर करू शकणार आहे.जीपीएस आधारित हे तंत्रज्ञान असून ट्रॅक्टर ऑटो स्टीअर आहे. तो सरळ रेषेत चालतो पण ऑटो हेडलेड फिचरमुळे वळविताही येतो.

Leave a Comment