ट्वीटरला संपूर्ण स्वदेशी मूषक नेटवर्कींग साईटचा पर्याय


मायक्रो ब्लॉगिग ट्वीटरला टक्कर देण्यासाठी स्वदेशी मोबाईल अॅप लाँच केले गेले असून ज्यांना टिवटर वापरता येत नाही अथवा ज्यांना ट्वीरचा कंटाळा आला आहे, त्यांच्यासाठी हा मस्त पर्याय दिला गेला आहे. इंडियन सोशल नेटवर्कींग साईट मूषकच्या रूपाने हा पर्याय दिला गेला आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्याचे लॉचिंग केले असून अनुराग गौड यांनी मातृभाषेत हे नेटवर्कींग तयार केले आहे.

गौड याच्या म्हणण्याप्रमाणे मातृभाषेत तयार केलेले देशाचे हे पहिले सोशल नेटवर्क असून अॅड्रोईड अॅप व वेब साईट दोन्हीवरही ते वापरता येणार आहे. सध्या ते हिंदी, मराठी व गुजराथी भाषेत उपलब्ध आहे व लवकरच अन्य प्रादेशिक भाषांतही ते उपलब्ध केले जात आहे. सध्याच त्याची युजर संख्या अडीच लाखांवर पोहोचली असून दररोज हजारो जण या साईटशी जोडले जात आहेत. योगगुरू रामदेवबाबा, आचार्य बाळकृष्ण, गायक अभिजित भट्टाचार्य आदी सेलिब्रिटी या साईटचा नियमित वापर करत आहेत.

या साईटवर अक्षरांची सीमा ५०० अक्षरांपर्यंत आहे शिवाय फोटो, व्हिडीओ, ऑडिओ शेअर करणे, डूडल बनविणे, फोटोंवर मेसेज लिहिणे अशी सुविधाही यात दिली गेली आहे. सध्या याचे प्राथमिक व्हर्जन लाँच झाले आहे मात्र नवीन फिचर्सचे व्हर्जन लवकरच दाखल होत आहे.प्ले स्टोअर्स मधून ते अपडेट करता येणार आहे.

Leave a Comment